वाढदिवसानिमित्त साखरवाडी येथे विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

वाढदिवसानिमित्त साखरवाडी येथे विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

साखरवाडी प्रतिनिधी 

 

साखरवाडी विद्यालय साखरवाडी आणि सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथील इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साखरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अपर्णा दत्तात्रय बोडरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सरपंच विक्रम आप्पा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हा कार्यक्रम दत्तात्रय बाबासाहेब बोडरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण पंचायत समितीचे BDO कुंभार साहेब, विस्तार अधिकारी बी. बी. भोसले साहेब, संग्राम दादा औचरे, मयुर लोखंडे (ग्रा. पं. सदस्य), साखरवाडी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक भोसले सर, गावित सर, कांबळे सर, रविंद्र टिळेकर सर तसेच विविध गावांतील सरपंच, शिक्षकवर्ग, स्टाफ आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत ग्रामपंचायतीतर्फे गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात आंबा, चिकू, पेरू, नारळ, वृदाक्ष आणि जंगली झाडांची मिळून एकूण १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें