बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या मोक्क्यातुन जामीनावर असलेल्या दोन तडीपार गुंडांना जेरबंद करुन पिस्टल, 6 मोकळया मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, मोबाईल व कार असा एकुण 15,80,000/रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या मोक्क्यातुन जामीनावर असलेल्या दोन तडीपार गुंडांना जेरबंद करुन पिस्टल, 6 मोकळया मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, मोबाईल व कार असा एकुण 15,80,000/रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

लोणंद प्रतिनिधी:

श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आगामी बकरी ईद व श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळयाच्या अनुशंगाने विनापरवाना शस्त्र बाळगणारे इसमांची व हददपार इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रोहित फार्णे यांचे

 

अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. दि.5/06/2025 रोजी अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे बातमीदाराचे मार्फत बातमी मिळाली की, मोक्क्यातुन जामीनावर सुटलेले व सातारा जिल्हयातुन तडीपार असलेले इसम नामे अमीत ऊर्फ बिऱ्या कदम रा. लोणी, ता. खंडाळा, जि. सातारा व विशाल महादेव चव्हाण रा. भोळी ता. खंडाळा, जि. सातारा हे त्यांचेकडील मारुती सुझुकी कंनीपीची एक्सल 6 मॉडेलची राखाडी रंगाची कार क्रमांक एमएच-12- टीएस- 1889 मधुन निरा ते लोणंद जाणारे रोडवर देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करणे करीता येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा यांनी सपोनि रोहित फार्णे यांना त्यांचे पथकासह नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणेच्या सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकाने लोणंद ते निरा जाणारे रोडवरील रेल्वे पुलावर सापळा लावुन कार क्रमांक एमएच-12- टीएस- 1889 मधील तडीपार आरोपी1) अमीत ऊर्फ बिऱ्या रमेश कदम वय-32 वर्षे रा. लोणी, ता. खंडाळा, जि. सातारा व 2) विशाल महादेव चव्हाण वय-30 वर्षे रा. भोळी, खंडाळा, जि. सातारा गुंडाना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 6 देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र), 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकुण 15,80,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असुन नमुद दोन्ही इसमांचेवर लोणंद पोलीस स्टेशन येथे अवैध शस्त्र बाळगुन तडीपारीचा भंग केलेबाबत गु.र.नं. 226/2025 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3(1),25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.

 

पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयातील हद्दपार/तडीपार इसम व अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसम यांचेवर यापुढे करडी नजर ठेवुन मिळुन आल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करणेत येईल.

 

सदर कारवाई मध्ये श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, लोणंद पोलीस स्टेशनकडील पोउनि श्री. घुले, धुमाळ, नाना भिसे, अतुल कुंभार, सायबर पोलीस स्टेशनकडील पोकॉ यशवंत घाडगे, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें