शालेय दाखले वितरीत करण्यासाठी शहर तलाठी यांना नियमित नियुक्त करण्यासह विविध मागण्यांसाठी रयत सेनेचे तहसीलदार यांना निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी – दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागला असून २०२५ व २०२६ या शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाअंतर्गत शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले लागतात. या दाखल्यांसाठी विद्यार्थी शहर तलाठी कार्यालयात चकरा मारतात मात्र शहर तलाठी हे काही वेळा कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय कामासाठी लागणारी दाखले वेळेवर मिळावेत म्हणून शहर तलाठी यांना रोज सजेवर म्हणजेच तलाठी कार्यालयात पूर्ण वेळ नियुक्त करावे, सेतू सुविधा केंद्र चालकांनी विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले वितरीत करावे तसेच स्टँप पेपर साठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने स्टँप पेपर उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना रयत सेनेच्या वतीने दि २८ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,
शहर तलाठी हे काही वेळा कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय कामासाठी लागणारी दाखले वेळेवर मिळत नाही म्हणून शहर तलाठी यांना रोज सजेवर म्हणजेच तलाठी कार्यालयात पूर्ण वेळ नियुक्त करावे,त्यांना इतरत्र कामे असल्याचे सांगितले जाते.
विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय कामासाठी दाखले वेळेवर मिळावेत म्हणून चाळीसगाव शहर तलाठी यांना रोज सजेवर म्हणजेच तलाठी कार्यालयात पूर्ण वेळ नियुक्त करावे व पूर्ण जून महिना तलाठी यांना इतर अतिरिक्त कुठलेही कामे देवू नये.
विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेवर मिळाले तर शालेय शिक्षणाचे प्रवेश सुरळीत होऊन विद्यार्थ्यांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत पूर्ण वेळ शहर तलाठी नियुक्त असल्यास त्यांच्या शालेय शिक्षणाचे प्रवेश सुरळीत होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच खाजगी सेतू सुविधा केंद्रा अंतर्गत लागणारे विविध दाखले विद्यार्थ्यांची लूट न होता योग्य ते पैसे घेऊन दाखले वितरित करण्यास सेतू सुविधा केंद्र चालकांना तहसीलदार साहेबांनी सूचना द्याव्यात , तसेच विविध कामासाठी अत्यावश्यक स्टँप पेपर लागतात मात्र स्टँप पेपर नागरिकांना स्टँप वेडर वेळेवर देत नाहीत त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात म्हणून नागरिकांना स्टॅम्प पेपर वेळेवर उपलब्ध करून घ्यावेत तहसीलदार यांच्या कडे रयत सेनेच्या वतीने केलेल्या सर्व मागण्या न्यायिक असल्याने लवकरात लवकर संबंधित विभागाला सूचना देवून नागरिक व विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून घ्यावेत तसेच नागरिक व विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास संबंधित विभागाच्या विरोधात रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी तहसीलदार साहेब व संबंधित विभाग जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,शहर तलाठी यांना रोज सजेवर म्हणजेच तलाठी कार्यालयात पूर्ण वेळ नियुक्त करावे, सेतू सुविधा केंद्र चालकांनी विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले वितरीत करण्यासह स्टँप पेपर साठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने स्टँप पेपर उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना रयत सेनेच्या वतीने दि २८ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,निवेदनाच्या प्रत
आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव,प्रांताधिकारी भाग चाळीसगाव, पोलीस निरीक्षक. शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत,निवेदनावर प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, शहरअध्यक्ष प्रदीप मराठे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, वाहतूक सेनेचे शहरअध्यक्ष धनराज मराठे,शहर संघटक शिवाजी गवळी, वाहतूक सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, शहर संघटक दीपक देशमुख, अभिजीत शिंदे, ऋषिकेश जाधव, संजय जोशी, भूषण पाटील,वैभव हिरेकर यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,













