जि. प. प्राथमिक शाळा राजळा सर्कल (सोनगाव बंगला) येथे तीन दशकांनी मैत्री चे सूर जुळले.

जि. प. प्राथमिक शाळा राजळा सर्कल (सोनगाव बंगला) येथे तीन दशकांनी मैत्री चे सूर जुळले.

 

गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी जि. प. प्राथमिक शाळा राजळा सर्कल (सोनगाव बंगला) येथे १९९४ ते १९९७ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.

 

या निमित्ताने तब्बल तीन दशकांनंतर शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जुन्या पानांची पखरण करत, काळाच्या वहीतून सुगंधी आठवणी शोधण्याचा सुंदर प्रयत्न झाला. परस्परांमधील आपुलकी, प्रेम आणि शाळेच्या गोड आठवणींनी कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले होते. “आमच्या यशामागे शाळेचीच पहिली पायरी आहे,” असे गौरवोद्गार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर आणि उत्साही वातावरणात पार पडले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुने क्षण पुन्हा अनुभवले आणि आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्या बॅचला शिकवणारे सर्व शिक्षकही या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. त्यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी स्नेहभावना आणि आदर व्यक्त केला.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री. कृष्णा जाधव सर होते. प्रास्ताविक माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री. नवनाथ जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. राजेश निकाळजे यांनी केले.

 

या प्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख सादर करत सध्याची कौटुंबिक व व्यावसायिक माहिती सांगितली आणि शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.

 

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला घड्याळ व सिलिंग फॅन भेट देण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आठवण म्हणून गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.

 

कार्यक्रमात उपस्थित शिक्षक – श्री. कृष्णा जाधव सर, अशोक रणवरे सर, शंकर माने सर, विजय लोकरे सर, नानासो धायगुडे सर, प्रतिभा कुंभार मॅडम, नितीन बनसोडे सर, संतोष माडकर सर.

 

तसेच माजी विद्यार्थी – दुर्गा ननावरे, स्वाती यादव, वंदना बनेनवार, अनिता मोरे, आदीका पिंगळे, अश्विनी पिंगळे, सविता गायकवाड, भारती भुजबळ, अंजली लोंढे, नवनाथ जगताप, राजेश निकाळजे, रमेश मदने, जयवंत मोरे, कालिदास भोईटे, विकास जाधव, आनंदा चव्हाण, प्रदीप खरात, आनंदा ठोंबरे, विशाल मोरे, किरण मोरे, रामा वीरकर, प्रदीप वायफळकर, नंदकुमार कुदळे आदींची उपस्थिती होती.

 

या स्नेहमेळाव्याला जि. प. प्राथमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री. धनाजी मोरे यांनी परवानगी देत सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. धर्मराज लांडगे, सोनगावचे माजी सरपंच पोपटराव बुरुंगले, ज्येष्ठ ग्रामस्थ हनुमंत गायकवाड, दत्तात्रय भोईटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें