महाबळेश्वर झाले कार्निवलमय

महाबळेश्वर झाले कार्निवलमय

कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ

सातारा दि.  

 महाबळेश्वर येथे होत असलेल्या महापर्यटन उत्सवामध्ये या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी कार्निवल परेड महाबळेश्वर येथे उत्साहात, अनेक रंगांची उधळण करत असंख्य पर्यटकांच्या साक्षिने संपन्न झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आराम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे महाराजांना अभिवादन करून व दुर्गा मातेच्या मूर्तीला नमन करून सुरुवात केली. 

 

या परेडमध्ये पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, श्रीमती विजयादेवी देसाई,

सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबेसिडर मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार, पर्यटक सहभागी झाले होते. 

 

कार्निवल परेडमध्ये महाराष्ट्रभरातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांचा सहभाग उत्साह वाढविणारा होता. नाशिक ढोल, लेझीम, वारकरी संप्रदाय, हलगी, यांच्या निनादात ही परेड संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या वेशभूषेतील पथकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच मास्कोट घातलेले कलाकार यांनाही लोकांनी दाद दिली. या संपूर्ण परेडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई ठिकठिकाणी लोकांशी, व्यापाऱ्यांची, पर्यटकांशी संवाद साधत होते. महाबळेश्वरने अनुभवलेली ही कार्णीवल परेड अनोखी आणि अनेक काळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहील अशी झाली. ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून या परेडचे स्वागत केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें