मनोरमा खेडेकर नंतर साताऱ्यात आली बॅनरर्ची ताई तिला आहे का ताब्याची घाई?
साताऱ्यातही गुन्हेगारीचे पुणेरी वारे वाहू लागले आहे की काय?
पुण्यातील खेडेकर दांपत्याने मुलीच्या शासकीय पदाचा वापर करून गरिबांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रकार उघडकीस आला होता. साताऱ्यातही आशा घटना वाढू लागल्या आहेत कि काय? निसर्गरम्य महाबळेश्वर परिसरात राहण्याच्या अभिलाषेपोटी गैरप्रकार घडत असल्याची चर्चा सतत कानावर पडते. याबाबत बातम्याही प्रसिद्ध होतात. पण सातारा जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. महाबळेश्वर मधील वन विभागाचे अधिकारी वनसंरक्षण करण्यामध्ये अपयशी झाल्याचे दिसत आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरात वृक्षतोड हा कळीचा मुद्दा झाला आहे. त्यातच महाबळेश्वर मध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नातेसंबंधातील भूमाफियांचे पेव वाढले आहे. निसर्गरम्य महाबळेश्वरला गुन्हेगारीची कीड लागली आहे की काय? अशीच परिस्थिती आहे एका बड्या अधिकाऱ्याशी नातेसंबंध असल्याचा गैरफायदा घेऊन साताऱ्यातही प्रति पूजा खेडेकर च्या आई अवतरल्या आहेत. त्यांचे कारनामे ऐकून अनेकांना घाम फुटतो. यांच्या गाडीमुळे कोणाला धक्का लागला तर संबंधित गाडीची दर्शनीय काच फुटते हॉकीचे फटके बसतात आणि गुन्हा ही दाखल होतो. वाद जरा मोठा असला की बंदुकीचा धाक असतो.
असे प्रकार सुरू असल्याची रंगतदार चर्चा आहे. एका बड्या अधिकाऱ्याशी नातेसंबंध असल्याने महसूल प्रशासन, वनविभाग, यांच्यासह पोलीस प्रशासन, यांच्या आदेशासाठी कर्तव्यदक्ष असतात.
गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे चार कॅबिनेट मंत्री एक उपमुख्यमंत्री यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष असणाऱ्या सातारा जिल्ह्यात असे प्रकार घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे. साताऱ्यातील इतिहासालाही गालबोट लागत आहे. असे असताना सुद्धा अधिकारी कर्मचारी साताऱ्यात मनमानी करत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ देत आहेत. त्यामुळे साताऱ्याची बदनामी होत आहे. प्रति मनोरमा खेडकर म्हणजेच बॅनरर्ची ताई ला नवीन ताब्याची घाई झाली आहे का? वनविभागाच्या हद्दीला लागून बॅनरर्ची ताईचे खोदकाम सुरू आहे. बॅनरर्ची ताईंनी किती खोदकाम केले आहे. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये कोणकोणत्या गोष्टी सुरू आहेत?
याकडे महसूल प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आहे. पण कारवाई का केली जात नाही? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. यामध्ये आमचं वन विभाग मागं नाही बर का? त्यांचेही वनविभागाजवळ सुरू असलेल्या हरकतींवर लक्ष आहे आणि तुटलेल्या झाडांवर मात्र मातीचे ढिगारे ओतून वृक्षतोड लपविण्याचा चांगला उपक्रम पाचगणी- महाबळेश्वर मध्ये सुरू आहे का? एवढं सगळं आहे मग आमचे पोलीस दादा का मागे राहतील. त्यांनीही एका प्रकरणाच्या मोजणी मध्ये पोलीस बंदोबस्त दिला. बंदोबस्तात साहेबाचं नाव नव्हतं पण साहेब सहा तास बसून होते? एका कुटुंबात पती-पत्नी व त्यांची दोन मुले यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था उद्भवू शकते म्हणून आठ पोलीस त्यांच्यासह मोजणी अधिकारी त्यांच्यासह छायाचित्रण करणारे आणि कुणीतरी कुख्यात व्यक्ती मोजणीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था वाचवत होती हे नवलच
अन पंचवीस तारखेला हद्दनिश्चिती करताना संरक्षण भिंत पाडून बॅनरर्ची ताई ताबा घेणार आहे असे म्हणणे संबंधित कुटुंबाचे आहे.
संबंधित कुटुंबाने याबाबत प्रशासनाने गांभीर्याने कारवाई न केल्यास वाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिना दिवशी सामुदायिक आत्मदहन करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे वनविभाग तुटलेल्या झाडांचा पंचनामा करून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार का?
महसूल विभाग उत्खननाचा पंचनामा करणार का? पोलीस प्रशासन बेकायदेशीर ताबा थांबविण्यासाठी कोणती कारवाई करणार? का त्या बड्या अधिकाऱ्याच्या भीतीपोटी हाताची घडी तोंडावर बोट अशीच भूमिका प्रशासन घेणार? ताईचे कारनामे इथेच संपलेले नाहीत













