जावली तालुक्यात 25 एप्रिल रोजी सरपंच पदांची सोडत

जावली तालुक्यात 25 एप्रिल रोजी सरपंच पदांची सोडत

सातारा दि. 23 : शासनाकडून प्राप्त झालेल्या सरपंच आरक्षणानुसार जावली तालुक्यामध्ये सरपंच आरक्षणाच्या जागा निश्चित करुन प्रवर्ग निहाय वाटप करण्यात आलेल्या आहेत. सन 2025 ते 2030 या कालावधीत निवडणूक होणाऱ्या 125 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी सोडत 25 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती सभागृह जावली (मेढा) येथे सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती जावली (मेढा)तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली आहे.

सरपंच आरक्षण सोडतीसाठी जावली तालुक्यातील125 ग्रामपंचायतीसाठी आरक्षित पदाचा तपशील पुढीलप्रमाणे अनूसचित जातीसाठी महिला 5 व खुला 4, अनुसूचित जमातीसाठी महिला 1 व खुला 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला 17 व खुला 16, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला 41 व खुला 40 अशा प्रकारे सरपंच आरक्षण सोडत होणार आहे.

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें