स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी जाहिर

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी जाहिर

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा जिल्ह्यामध्ये प्रथम तर कोल्हापूर विभागामध्ये द्वितीय क्रमांक 

सातारा, दि.22 : स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समिती यांच्या सन 2023-24 वर्षीच्या क्रमवारीमध्ये पहिल्या शंभर मध्ये कोल्हापूर विभागातील पंधरा बाजार समित्यांचा समावेश असून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची सन 2023-24 या वर्षाकरिता वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

             कोल्हापूर विभागातील एकूण 21 बाजार समित्यांपैकी पंधरा बाजार समित्या राज्यातील पाहिल्या 100 क्रमवारीमध्ये कोल्हापूर विभागातील आटपाडी बाजार समिती प्रथम क्रमांकावर , फलटण बाजार समिती द्वितीय क्रमांकावर व लोणंद बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे. आटपाडी बाजार समिती राज्यस्तरावर 22 व्या क्रमांकावर, फलटण बाजार समिती 24 व्या क्रमांकावर, तर लोणंद बाजार समिती 29 व्या क्रमांकावर आहे.

            यामध्ये बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा व इतर सुविधा याकरिता 80 गुण,बाजार समितीचे आर्थिक निकषाकरिता 35 गुण, बाजार समितीचे वैधानिक कामकाज 55 गुण, इतर विशेष निकषाकरिता 30 गुण असे एकूण 200 गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारे बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी देण्यात आली आहे. राज्याच्या पणन संचालनालयाकडून स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्याकडून राज्यस्तरीय क्रमवारी घोषित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय क्रमवारी मुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्या बाजार समितीमध्ये विक्री करावा याचा विचार करून शेतकरी आपला शेतमाल संबंधित बाजार समितीमध्ये पाठवू शकतील. बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांचे करिता उपलब्ध असणाऱ्या सुविधा तसेच आर्थिक व्यवहार, कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीमध्ये चालणारे कामकाज या विविध बाबींचा विचार करून क्रमवारी देण्यात आलेली आहे. यामध्ये आटपाडी सारखी तालुका स्तरावरील बाजार समिती शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या विविध योजना, व्यापाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा या अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शासनाच्या विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी व बाजार आवारातील विविध घटकांसाठी सर्वाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बाजार समितीने केलेला आहे.

       फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी, हमाल, मापाडी व इतर घटकांकरिता विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. फलटण येथील शेतकरी समस्या निवारण कक्षाचे कामकाज,कार्डीयक ॲम्ब्युलन्स, पेट्रोल पंप आणि शेतकऱ्यासाठी अल्प दरात जेवण यामुळे फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज लोकाभिमुख राहिले आहे. यामध्ये, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव, सर्व संचालक मंडळ व बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें