पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सिने स्टाईलने गांजा विक्रेत्यांना पकडले

पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सिने स्टाईलने गांजा विक्रेत्यांना पकडले

साखरवाडी प्रतिनिधी : शिवाजी भोसले

साखरवाडी ता फलटण गावाच्या हद्दीत दि १४ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता स्वतःचा जीव धोक्यात घालून फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा वाहतुक करणारी एक चार चाकी एम एच ११ बी एच ०४०४ गाडी पकडून त्यामधून १०.३० किलो गांजा व चार चाकी असा ५ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, डीबी चे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना माहिती मिळाली की, एक स्विफ्ट कार सुरवडी गावाकडून साखरवाडी कडे जात आहे असून त्यामध्ये गांजा आहे त्यांनी तत्काळ तिथे उपस्थीत डीबी पथक व आरसीपी दोन कर्मचारी यांच्या मदतीने ती गाडी अडविण्याचा प्रयत्न केला या गाडीत दोन व्यक्ती होते एक चालक व एकजण त्याच्या बाजूला बसला होता गाडी थांबली त्यावेळी ड्राइवर बाजूने पीएसआय बदने चालकाशी चौकशी करत असताना चालकाने अचानक दरवाजा ओढून घेतला व गाडी सुरू केली पीएसआय बदने यांचा उजवा हात दरवाजा मधे अडकला व गाडी चालकाने त्याना फरफटत नेले त्यांच्या पायाची संपूर्ण कातडी जमिनीला घासलेमुळे निघाली नंतर पुढे ७ सर्कल रोड येथे राम भोसले यांच्या शेतात गाडी धडकून थांबली त्यावेळी गाडीचा चालक पळून गेला शेजारी बसलेले व्यक्ती स्थूल असलेमुळे त्याला पळता आले नाही नंतर डीबी स्टाफ तिथे पोहचला त्यावेळी स्विफ्ट डिजायर गाडीत पांढऱ्या गोणीत १०.३० किलो गांजा मिळून आला बाजूस बसलेले इसमाने स्वतःचे नाव सांगणेस सुरवातीला नकार दिला व नंतर खोटे नाव सांगितले नंतर त्याने त्याचे नाव लक्ष्मण रामू जाधव वय अंदाजे ६० वर्ष राहणार पिलीव ता माळशिरश जिल्हा सोलापूर सांगितले व पळून गेलेले इसमा चे नाव रणजीत लक्ष्मण जाधव सांगितले संशयतांवर पूर्वी म्हसवड, लोणंद, माळशिरस या ठिकाणी ४ गांजा वाहतूक गुन्हे दाखल आहेत चार चाकी शेतात गेल्याने त्यालाही मुका मार लागला आहे डीबी पथक ने पीएसआय बदने व संशयित लक्ष्मण रामू जाधव याला फलटण येथील खाजगी रुग्णालयात व तिथून पुढे सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले गोपाल बदने यांनी जीवावर उदार होऊन गाडी अडविण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचे पाय सोलून निघाले आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिकाशक डॉ वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल. धस यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीस हवालदार नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, अमोल देशमुख,पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पो ना अमोल पवार, अमोल देशमुख यांनी केली. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें