चाळीसगाव येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव जैन समाज तर्फे दि.१० रोजी भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमीत्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली जैन स्थानक आठवडे बाजार येथुन सुरु होऊन सर्व जैन मंदिरांचे दर्शन घेऊन अरिहंत मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. समस्त जैन समाज तर्फे अरिहंत मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले, यावेळी पारसमलजी चोरड़िया यांचा सत्कार जैन समाजचे उपाध्यक्ष विनोद जैन व सदस्य मनोज सेठी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नवकारशीचे लाभार्थी ताराबाई जेठमल पारख व विनोद पारख परिवार यांचा सत्कार योगिता विनोद आचलीया, चेतना मयूर दगडा, सिद्धेश बोरा, मनीष लोढाया ह्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी नवकारशीची व्यवस्था पारख परिवारा तर्फे करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून मनोज गोविंदवार यांनी आपल्या उदबोधनात रिश्तोंकी छांव में सपनों के गांव में हया विषयावर वर्णन केले. मनोज गोविंदवार ह्यांचा सत्कार सचिव सुशील सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अध्यक्ष संदिप जैन यांनी केले. याआधी जैन समाज कार्यकारीणीच्या मार्गदर्शनात ७ तारखेला सकाळी रक्तदान शिबिर ,8 तारखेल देवलिया पार्श्वनाथ माजीसा संस्थान व श्रीमती ताराबाई जेठमलजी पारख यांच्यातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, तसेच संध्याकाळी विरतीवृंद ग्रुप तर्फे जैन भजनांवर आधारित डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले. ९ तारखेला विश्व शांती व विश्वकल्याण हेतु सामुदायिक नवकार महामंत्र प्रार्थना आयोजीत करण्यात आली होती. त्यामध्ये समस्त जैन समाज कार्यकारीणी ने 2 LED लाऊन सर्वांना कार्यक्रम ONLINE बघण्यासाठी व्यवस्था केली होती. या कार्यक्रमात जवळपास ७००/८०० श्रावक श्राविका यांनी भाग घेतला होता. तसेच ११ वाजता जैन नवयुवक मंडळ व भारतीय जैन संघटना ह्यांनी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन समाज मंडळाचे अध्यक्ष संदिप दगडा, उपाध्यक्ष विनोद जैन, सेक्रेटरी सुशील सोळंकी, खजिनदार सिद्धेश बोरा, सहसचिव मनिष लोडाया, प्रसिद्धी प्रमुख ऋषभ सुराणा विजय पोलाडिया, मनोज सेठी, शुभेश बोरा, नमित खिंवसरा, स्वप्निल ताथेड आदित्य धाडीवाल यांनी प्रयत्न केले.













