लोणंद पोलीसांनी खुनातील आरोपी यांना केले एक तासात जेरबंद
लोणंद. प्रतिनिधी
लोणंद.दिनांक 5/4/2025 रोजी दुपारी 12.30 वाजताचे इंदीरानगर ता. खंडाळा जि. सातारा गावचे हददीत बिरोबा मंदीरात आरोपी नामे सतिश भाऊसोध काळे व रोहीत शिवाजी डेंगरे दोन्ही रा. इंदीरानगर लोणंद ता. खंडाळा जि. सातारा यांनी पुर्वीच्या भांडणाचे कारणावरुन किरण किसन गोवेकर रा. कोरेगाव ता. फलटण जि. सातारा यास लाकडी फळकुटाने डोक्यात मारुन, चाकुने छातीत भोकसुन, चाकुने डोक्यात वार करुन खुन करुन सतिश काळे व रोहीत डेंगरे हे फरारी झाले होते.
सदर आरोपींना पकडणेबाबत मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. बी.वाय. बालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई चार्ज फलटण यांनी सुचना दिल्याने सपोनि सुशिल बी. भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल कदम, मपोउनि. ज्योती चव्हाण, पोहवा चंद्रकांत काकडे, पोकॉ. सचिन कोळेकर यांनी आरोपींची माहीती घेवुन त्यांना शिताफीने गुन्हा घडलेपासुन 1 तासाच्या आत लोणंद येथुन ताब्यात घेतले.
सदरची कारवाई मा.श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बी.वाय. बालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई चार्ज फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि विशाल कदम, मपोउनि ज्योती चव्हाण, पोउनि शिवाजी घुले, सपोफौ देवेंद्र पाडवी, पोहवा चंद्रकांत काकडे, नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठठल काळे, सुनिल नामदास, सचिन कोळेकर, सतीष दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर विकास कोकरे, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे हार्दीक अभिनंदन केले आहे.













