प्रेम प्रकरणातील बदनामी च्या रागातून एकाचा खून

प्रेम प्रकरणातील बदनामी च्या रागातून एकाचा खून

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

प्रेमप्रकरणा बाबत बदनामी केल्याच्या रागातून एका चा खुन केल्याची घटना आदर्की खुर्द तालुका फलटण लोणंद येथे घडली आहे. याबाबत लोणंद पोलीसांनी नोंदवला गुन्हा, अधिक तपास सुरू
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याचे एका मुली समवेत असलेल्या प्रेमसबंधा बाबत गावातील त्याच्याच्या भावकीतील रत्नशिव निंबाळकर याने बदनामी केल्याचा संशय व्यक्त करून व त्याचा राग मनात धरून ( ता. १२) रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आदर्की खुर्द ( ता. फलटण) गावच्या हद्दीत आदर्की बुद्रूक ते आदर्की खुर्द रस्त्यावर राजेंद्र भालेराव जाधव यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरासमोर दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याने आपला मित्र विनोद महादेव राक्षे याच्याशी संगणमत करून रत्नशिव संभाजी निंबाळकर याचा खून करण्याचे उद्देशाने प्रथम त्याच्या दुचाकी स्कूटी क्रमांक ( एमएच ४७- व्ही -०५४९) ला पाठीमागून कार क्रमांक
(एमएच -२६- बीएक्स ६५४६) ने जोरदार धडक देवून अपघात घडवून आणला होता.
अपघातात रत्नशिव निंबाळकर हा खाली पडल्यावर त्यास विनोद महादेव राक्षे याने पाठीमागून धरले तर दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकर याने त्याच्या डोक्यात, हातावर कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला.अशी फिर्याद
मृत रत्नशिव निंबाळकर यांचा भाऊ कमलेश संभाजी निंबाळकर
( वय ३६) मूळ रा.आदर्की खुर्द यांनी ( ता. २०) लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी लोणंद पोलिसांनी विनोद महादेव राक्षे
व दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर दोघेही रा.आदर्की खुर्द (ता.फलटण) यांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवला असून विनोद महादेव राक्षे यास अटक केली आहे.
तर दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर हा फरार झाला आहे. विनोद राक्षे यांस आज फलटण न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवस ( ता. २५) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
घटनास्थळी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरक्षक सुशिल भोसले हे अधिक तपास करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें