राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कान, नाक व घसा यांची होणार तपासणी
सातारा, दि.3 : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५ मार्च २०२५ रोजी जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने रुग्णालयामध्ये येणा-या रुग्णांची कान, नाक व घसा तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली आहे.
तसेच जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
Author: AVB Majha
Post Views: 242













