डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महा स्वच्छता अभियान 

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महा स्वच्छता अभियान

प्रतिनिधी किरण शिंदे

रायगड:महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दि २ मार्च २०२५ रोजी महास्वच्छता अभियान राबावण्यात आली या मोहिमेत माणगाव तालुक्यातील शेकडो श्रीसदस्यांसोबत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत माणगाव तसेच गोरेगाव शहर परसरातील विविध ठिकाणी श्रमदान करून ५० टन कचरा गोळा केला. सदर कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये नेण्यात येऊन त्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात आली. यावेळी यावेळी सरकारी कार्यालयांची आवारे, प्रमुख रस्त्यांसह शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे माणगाव तसेच गोरेगाव शहर स्वच्छ झाले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे तर्फे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान घेण्यात आले. हे स्वच्छता अभियान म्हणजे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसदस्यांनी उत्स्फूर्तपणे केलेले विनम्र अभिवादन आहे. या उपक्रमात माणगाव तसेच गोरेगावातील सरकारी कार्यालयांची आवारे, शहरातील संपूर्ण रस्ते, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या अभियानात एकूण १२०० मनुष्यबळ सहभागी झाले होते, त्याबरोबर ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप, घंटागाडी आदी वाहनांचा वापर करून एकूण कचरा ५० टन गोळा करण्यात आला….

मनुष्य जन्माला येताना अनेक प्रकारची ऋणे घेऊन जन्माला येतो यामध्ये देशाचे, गावाचे, सामाजाचे, आई-वडिलांचे, परंपरेचे आशा प्रकारची ऋणे आसतात. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, स्मशानभूमी स्वच्छता, विहिरी व तलावातील गाळ काढणे असे अनेक सामाजिक उपक्रम डॉ. श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे माध्यमातून श्रमदानातून व निष्कामतेतून करून या देशाचे ऋण कसे फेडले पाहिजे हे समाजासमोर उत्तम उदाहरण त्यांनी ठेवले आहे…

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें