छत्रपती शिवाजी महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

सातारा दि.19- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचा आदर्श ठेवूनच शासन काम करीत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्र राज्य अधिक प्रगतशील करण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें