संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
चाळीसगाव (प्रतिनिधी)
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे राबविल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती व क्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने शिवसेवा सप्ताह च्या तिसऱ्या दिवशी आज क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती संस्कार गुरुकुल पब्लिक स्कूल शिंदी या शाळेमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच या जयंती निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी सेवालाल महाराजांच्या 52 वाते आहेत त्यावरती प्रकाश टाकले. तसेच महाराजांची एक म्हण होती “जाणजो छानजो पचज मानजो” तसेच रपिया कठोरो पाणी वक जाय असे अनेक वाते शिक महाराजांनी त्या काळात सांगितले होते. आणि आज ते सत्यात उतरत आहेत. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आरती महाले यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावना केली व आभारी मानले. प्रतिमापूजन व श्रीफळ वाढण्याचे कार्य संजय देशमुख यांनी केले. अंकुश राठोड, भगवान डोंगरे, मच्छिंद्र सोनवणे, देशमुख काका,ओंकार जाधव, रुखमाबाई चव्हाण, पल्लवी जाधव, विलास जाधव, आकाश राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते.













