फलटण डॉक्टर्स असो. आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी व दुहेरीत डॉ. पुनमपिसाळ यांना विजेतेपद
मुधोजी क्लब आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मिश्र स्पर्धेमध्ये डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांना विजेते
फलटण प्रतिनिधी : ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ .पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व महिला दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले.
अतिशय उत्कंठ पूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात दोन ही सरळ सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत त्यांनी हे यश संपादन केले आहे
तसेच दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मुधोजी क्लब तर्फे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी सामन्यात डॉक्टर पूनम पिसाळ व योगेश शेलार यांनी मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले त्यांच्या या यशाबद्दल फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व खजिनदार तसेच सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.













