हॉटेल हिराबाग मध्ये विभत्स डान्स (पाचगणी) येथे 20 जणांवर गुन्हा दाखल करून केली पोलीसांनी कारवाई

हॉटेल हिराबाग मध्ये विभत्स डान्स (पाचगणी) येथे 20 जणांवर गुन्हा दाखल करून केली पोलीसांनी कारवाई

पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथे बारवालांच्या नंगानाच चालू असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यात २० जणांना घेऊन २४ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा जिल्ह्यातील वगतिक वारसा लाभलेल्या पर्यटनस्थळी अशे अवैध धंदे रोजरोसपाने सुरु असून यावर वाचक म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अशा प्रकारांवर वाचक बसण्यासाठी धडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या. त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील हॉटेल हिराबागच्या हॉलमध्ये गायिकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन 12 महिला आणल्या असून त्या गाण्यांच्या तालावर अश्लील हावभाव करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि पवार व सोबत पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व त्याचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले. पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) चे हॉलमध्ये छापा टाकून सदर हॉटेलच्या हॉलमध्ये जावुन पाहीले असता 12 बारबाला आळीपाळीने येवुन तोकड्या कपडयात तेथे सुमारे 20 गिऱ्हाईकांच्या समोर उभ्या राहुन अश्लील हावभाव करुन गिऱ्हाईकांच्या जवळ जावुन त्यांचेशी लगट करीत असल्याचे दिसले. सदर बारबालाच्या या कृत्यावर गिऱ्हाईक इसम आनंद घेवुन त्यांचे सोबत नृत्य करीत होते. हे निदर्शनास आले असता 20 जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये हॉटेल मालकासह इतर 20 लोकांवर गुन्हा दाखल केला असुन सदर ठिकाणाहुन साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण 25 लाख 45 हजार 500 रुपयांचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिलीप पवार हे करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें