भरड धान्य आरोग्यासाठी लाभदायी – डॉ. प्रियदर्शनी देशमुख

भरड धान्य आरोग्यासाठी लाभदायी – डॉ. प्रियदर्शनी देशमुख

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 आयोजित चर्चासत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कालवडेचे विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान विभागाच्या डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भरड धान्य हे आरोग्यासाठी पौष्टिक व लाभदायी असे मार्गदर्शन केले. सदरील चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी श्री. रामदास कदम, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण हे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी मिलेट्स म्हणजे भरडधान्य हा संपूर्ण पोषक आहार आहे. म्हणूनच याला भारतात ‘श्रीअन्न’सुद्धा म्हंटले जाते. गहू-तांदूळ वगळता ज्या धान्यांवरील नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यावर त्यांचा वापर आहारात करता येतो. अशा धान्यांना भरडधान्य म्हणतात. भरडधान्य गटात ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, राजगिरा, डेंगळी आदी तृणधान्ये मोडतात. भरडधान्यात ग्लुटेन नसल्याने त्यातून शरिराला उत्तम पोषण मिळू शकते. शिवाय भरडधान्यांतील विविध पोषणमूल्यांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यासाठीही मदत होऊ शकते असे विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री. प्रतिक भोसले यांनी मार्गदर्शन करताना भारतीय शेती संस्कृती व बदलत्या शेतीचे पंचसुत्रे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, दुष्काळातील प्रगतशील शेती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना श्री. रामदास कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व अधिकतम शेती उत्पादन, बदलती पिक पद्धती व तंत्रज्ञान आधारित शेती प्रणाली या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रासाठी श्री. शरदराव रणवरे, व्हॉईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, डॉ. नागेश गावडे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कालवडे, श्री. एकनाथ गोडखे, प्रगतशील शेतकरी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा चौगुले या विद्यार्थिनीने केले.
शब्द संकलन ्व शब्दांकन – प्रा. एन. एस. धालपे , डॉ. जी. बी. अडसूळ

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें