क्रांतीमाता सावित्रीमाई जोतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्ताने माळीबेंद सासवड येथे महिला आरोग्य तपासणी व मोतीबिंदू तपासणी ३ व ४ जाने. रोजी दोन दिवशीय शिबिराचे आयोजन

    क्रांतीमाता सावित्रीमाई जोतिबा फुले यांच्या १९४व्या जयंती निमित्ताने माळीबेंद सासवड येथे बॉस्को ग्रामीण विकास केंद्र आणि कमिन्स इंडिया लिमिटेड यांच्या माध्यमातून श्री अमोल शिवाजीराव रासकर यांनी महिला आरोग्य तपासणी व मोतीबिंदू तपासणी ३ व ४ जाने. रोजी दोन दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

३जानेवारीला स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांती माता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्या दिवशी सर्व महिलांचा सन्मान म्हणून महिला,गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली या सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सॅनिटरी नॅपकिन चे वाटप घेण्यात आले त्यात भागातील बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासून घेतले यावेळी स्त्री रोग तज्ञ पोळ मॅडम, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र चे पदाधिकारी श्री आबासाहेब काटकर सासवड ग्रामपंचायतचे माजी सरपंच सौ.संगीता जाधव मॅडम,शिवसेनेचे तालुका नेते नंदकुमार काकडे,अमोल रासकर,किरण जाधव, प्रताप भुजबळ, रक्त तपासणी लॅबचे समीर झणझणे, श्यामराव भुजबळ,रुस्तम भुजबळ,मुरलीधर जाधव, संजय भुजबळ,नंदकुमार भुजबळ, राजेंद्र भुजबळ, मुख्याध्यापक चव्हाण सर ,शिंदे सर अंगणवाडीच्या रासकर मॅडम, जाधव मॅडम, निगडे मॅडम आरोग्य विभागाचे डांगे साहेब ,काकडे मॅडम तसेच सर्व उपस्थित महिला व जिल्हा परिषद शाळा माळीबेंद येथील सर्व विद्यार्थी यांनी क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच उद्या मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून सर्व नागरिकांची अद्ययावत मशीनने तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नेत्र तपासणी करण्यात येणार असून अल्प दरात चष्मे दिले जाणार आहेत, आणि ज्या कोणास मोतीबिंदू आढळून येईल त्या सर्व व्यक्तींची शिरवळ येथील कमला मेहता हॉस्पिटल येथे सर्व खर्च सहित मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार असून ज्यांना कुणाला डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या सर्व विद्यार्थी व नागरिकांनी फायदा करून घ्यावा असे उपस्थित सर्व महिला व ग्रामस्थ यांना श्री अमोल शिवाजीराव रासकर यांनी सुचवले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें