३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गैरवर्तन व हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर दोषी आढळल्यास होणार कडक कारवाई-श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गैरवर्तन व हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर दोषी आढळल्यास होणार कडक कारवाई-श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा

फलटण:३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गैरवर्तन व हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर दोषी आढळल्यास होणार कडक कारवाई-श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा.

दिनांक ३१/१२/२०२४ रोजी गतवर्षास निरोप व १ जानेवारी २०२५ नवीन वर्षाचे स्वागत संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्साहात व जल्लोषात साजरे केले जाते. या वेळी मोठया प्रमाणावर लोक एकत्र येतात याचाच फायदा घेऊन काही समाजविघातक/ देशविघातक / समाजकंटक व्यक्तींच्याकडून हिंसा तसेच आतंकवादी कारवाया केल्या जाण्याची शक्यता असून यामधून समाजकंटकांना मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळविण्याची संधी उपलब्ध होते. सदरवेळी समाजकंटकांकडून जातीय सलोखा बिघडविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर केला जातो. तसेच मोठ्या प्रमाणावर हिंसात्मक कारवाई करण्यासाठी, तरूणांचा वापर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो.सदरच्या ३१/१२/२०२४ रोजी गतवर्षास निरोप व १ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व उत्साहात साजरे करीत असताना कोणताही अनुचित प्रकार अगर अप्रिय घटना घडू नये याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून एकूण ९७ पोलीस अधिकारी, १३०३ पोलीस अंमलदार आणि ५०० गृहरक्षक नेमण्यात आले आहेत तसेच प्रत्येक पोलीस ठाणेकडील वाहतूक कर्मचाऱ्यांकडे मद्यपी वाहनचालक यांची तपासणी करण्याकरीता ३३ ब्रीथ अॅनालायझर मशिन्स देण्यात आलेल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांचा वापर करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ नये म्हणून पोलीस दलाकडून समाजमाध्यमांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गर्दीच्या, बाजारपेठांच्या, सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी सक्त नाकाबंदी नेमण्यात येणार असून पेट्रोलींग, कोंबींग ऑपरेशन तसेच सातारा जिल्ह्याचे हद्दीवर चेक पोस्ट नेमून वाहनांची पडताळणी/ तपासणी करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतूदीनुसार ध्वनी पातळी नियंत्रित रहावी याकरीता ध्वनीक्षेपक/डॉल्बी/साऊंड सिस्टीम यांचेवर ध्वनीक्षेपण उपकरणांचा वापर करून ध्वनी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमाच्यावेळी मोठया प्रमाणात महिला / तरूणी सहभागी होत असतात अशावेळी महिलांची/तरुणींची छेडछाड अगर गैरकृत्य होणार नाही याकरीता छेडछाड / गैरकृत्य करणा-या इसमांवर निर्भया पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही मद्यपी / अंमली पदार्थांचे सेवन करणारे ऐतिहासिक / सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करतात त्यांचेवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, तापोळा, बामणोली व इतर पर्यटनस्थळी बरेचशे पर्यटक ३१डिसेंबर साजरा करण्यासाठी येत असतात. सदर ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख यांनी सदरचा जुन्या वर्षाचा निरोप व नवीन वर्षाचे स्वागताचा उत्सव उत्साहात, जल्लोषात शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे व हा उत्सव साजरा करताना कोणीही हुल्लडबाजी करू नये असे अवाहन केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें