सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली; संतोष पाटील सातारचे नवे जिल्हाधिकारी.
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागेवरी संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर ७ जून २०२३ रोजी त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड़ी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती. गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात डुडी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली महाराष्ट्र मधील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे मोकाट् अतिक्रमणा विरोधात डुडी यांनी ठाम भूमिका घेऊन अतिक्रमणे जमीन दोस्त केली. तसेच कास पठार येथील अतिक्रमे थांबवण्याचा निर्णय घेतला दरम्यान आज राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार त्यांची बदली पुणे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली सातारा जिल्ह्यातील डुडी यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.













