गोखळी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश गावडे-पाटील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार
फलटण | प्रतिनिधी
फलटण पूर्व भागातील गोखळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश तानाजी गावडे-पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर माजी खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
गोखळी येथील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या सहकार क्षेत्रातील या संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी योगेश गावडे-पाटील यांच्याकडे आली आहे. ते भाजपचे युवा नेते असून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक म्हणून परिचित आहेत.
या निवडीबद्दल आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा अभिजीत जगताप, मनोज तात्या गावडे यांच्यासह गोखळी व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












