अवयवदानाचा संकल्प करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आदर्शवत पुढाकार! ‘आपली फलटण मॅरेथॉन’च्या व्यासपीठावरून नागरिकांनाही अवयवदानासाठी आवाहन

अवयवदानाचा संकल्प करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आदर्शवत पुढाकार!

‘आपली फलटण मॅरेथॉन’च्या व्यासपीठावरून नागरिकांनाही अवयवदानासाठी आवाहन

फलटण | प्रतिनिधी
समाजहिताच्या कार्यात योगदान देत माजी खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्यांनी ऑनलाइन फॉर्म भरून अवयवदानासाठी नोंदणी केली असून, नागरिकांनीही या जीवनदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
जोशी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करत या सामाजिक उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.
अवयवदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागरूकता वाढविणे आणि अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या आवाहनातून स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य संचालक तथा फलटणमधील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देतानाच अवयवदानासारख्या महत्त्वपूर्ण विषयाला चालना मिळाल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अवयवदानाचा संकल्प करा, जनजागृती वाढवा आणि गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा द्या!

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें