जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय

२४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार नाही; भाविक, व्यावसायिक, दुकानदार व स्टॉलधारकांनी नोंद घेण्याचे आवाहन

फलटण : जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरदेव देवस्थानच्या श्री बिरोबा देवाची दिनांक २४, २५ व २६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी वार्षिक यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. याबाबत श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली असून, यात्रा रद्द करण्याच्या निर्णयाची सर्व भाविक भक्तांसह व्यावसायिक, दुकानदार आणि यात्रेनिमित्त व्यवसायासाठी येणाऱ्या संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेला धार्मिक आणि भक्तिभावाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून भाविक देवदर्शनासाठी येत असतात. तसेच या कालावधीत विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि अन्य व्यवसायांच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक सहभागी होत असतात. त्यामुळे यात्रा रद्द झाल्याच्या निर्णयाची माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे याकरिता देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे

यावर्षी यात्रा होणार नाही; ट्रस्टकडून स्पष्ट सूचना

श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी श्री बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात येणार नाही. त्यामुळे या तारखांना यात्रेसाठी जाधववाडी येथे येण्याचे नियोजन केलेल्या भाविकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी. यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांनी यात्रेच्या अनुषंगाने प्रवासाचे नियोजन करू नये, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनाही लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.

व्यावसायिक, दुकानदार व स्टॉलधारकांनीही नोंद घ्यावी

यात्रेच्या काळात व्यवसाय करण्यासाठी येणारे व्यावसायिक, दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते आणि स्टॉलधारक यांच्यासाठीही ही महत्त्वाची सूचना आहे. यावर्षी यात्रा होणार नसल्याने संबंधितांनी यात्रेच्या निमित्ताने दुकाने किंवा स्टॉल उभारण्यासाठी जाधववाडी येथे येण्याचे नियोजन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.यात्रा रद्द झाल्याबाबत कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये तसेच भाविक आणि व्यावसायिकांना वेळेत योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने देवस्थान ट्रस्टच्या वतीने ही सूचना देण्यात आली आहे.

भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या यात्रा रद्द करण्याच्या निर्णयाची सर्व भाविक भक्त, व्यावसायिक, दुकानदार आणि संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच ही माहिती इतर भाविकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे, ,असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें