छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलन सातारा या ठिकाणी 14 वर्षाखाली जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत साखरवाडी विद्यालयचा दणदणीत विजय
प्रतिनिधी. शिवाजी भोसले
फलटण साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने अभिमानास्पद कामगिरी करून दणदणीत विजय मिळवला.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुलींचा फायनल सामना साखरवाडी विरुद्ध कोरेगाव सातारा यांच्यात झाला या सामन्यात साखरवाडी संघाने एकतर्फी विजय मिळवून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले त्याबद्दल खेळाडूंचे, श्रावणी तावरे,कादंबरी वाघ,इशिता लांडगे ,सिद्धी वाघ, समृद्धी भापकर, स्वरा झणझणे मलिहा पठाण, ईश्वरी ताकवले, आरोही पवार शिवांजली भोसले, कादंबरी गायकवाड ,श्रद्धा मोरे, व प्रशिक्षक श्री.गावित सर व व्यवस्थापक श्री.गांगुर्डे सर व साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाच्या खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे साखरवाडी विद्यालयाचे माजी खेळाडू, विवेक भोसले, धीरज जगताप, सुधीर बोडरे, शंकर बोडरे राहुल इंगळे या सर्वांचे अभिनंदन केले त्यावेळेस उपस्थित साखरवाडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री.प्रल्हादरावजी साळुंखे पाटील (तात्या)
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.धनंजय दादा साळुंखे पाटील व साखरवाडी विद्यालयाचे संचालक मा.श्री.राजेंद्र शेवाळे (नाना )व राजेंद्र भोसले तसेच मा.श्री.माणिक आप्पा भोसले व साखरवाडी विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापिका मा.सौ जगदाळे मॅडम व ज्येष्ठ शिक्षक मा.श्री. लांडगे सर व मा. श्री.जाधव सर शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच खेळाडूंचे सर्व पालक वर्ग या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या













