“लेक शिकवा, लेकीला पंख द्या अन् आकाशाला गवसणी घालू द्या!” अमोलभाऊ भागवत यांचा संदेश; कसबे सुकेणे येथे ‘लेक लाडकी’ जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!
नाशिक प्रतिनिधी. सचिन देवरे
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ‘लेक लाडकी जनजागृती शिबिर’ उत्साहात पार पडले.
समाजसुधारक अमोलभाऊ भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात तरुणींमधील वाढत्या आत्महत्या, युवावस्थेतील चुकीचे निर्णय, बदलती मानसिकता आणि त्याचे सामाजिक परिणाम यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवीताई जाधव उपस्थित होत्या. यावेळी डॉ. विद्या गडाख, कवी-लेखक राज शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
परिसरातील गुणवंत विद्यार्थी, आरोग्यसेवक आणि समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या स्थानिक युवक-युवतींचे विशेष कौतुक करण्यात आले.
मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













