खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुसेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; किशोर नंदू खटावकर रंगेहाथ पकडले

सातारा | प्रतिनिधी

खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करून मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुसेगाव, ता. खटाव येथील मंडलाधिकारी किशोर नंदू खटावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे घाडबदरे (काटगुण), ता. खटाव येथे जमीन खरेदी केली होती. या खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करून मंजूर करण्याच्या प्रक्रियेसाठी मंडलाधिकारी किशोर खटावकर यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुसेगाव येथे सापळा रचण्यात आला. यावेळी संबंधित मंडलाधिकारी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाच्या हाती लागले.

या कारवाईत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील दाजी पाटील यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली.

सापळा पथकात पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार निलेश राजपूरे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित कर्णे यांचा समावेश होता.

या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें