सौ रोहिणी आशिष अहिरराव यांची धाडणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड.

सौ रोहिणी आशिष अहिरराव यांची धाडणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड.

साक्री प्रतिनिधी : – ( 25 ऑगस्ट 2026 ) विलासराव पाटील.

आज सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत धाडणे येथे सौ रोहिणी आशिष अहिरराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.धाडणे येथील ग्रामपंचायत मध्ये आज सकाळी 10.00 वाजता सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. यावेळी धाडणे ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांपैकी सरपंचांसहित एकूण 10 सदस्य हजर होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री. अमरसिंग गावित यांनी काम पाहिले. या सगळ्या सदस्यांमधून उपसरपंच पदासाठी फक्त सौ रोहिणी आशिष अहिरराव यांचेच नाव पुढे आले. उपसरपंच पदासाठी सौ रोहिणी अहिरराव यांच्या नावाला माजी उपसरपंच श्री विनायक अहिरराव व ग्रामपंचायत सदस्य विकास पवार यांनी अनुमती दर्शवली. सरपंच श्रीमती उषाबाई सोनवणे यांच्यासह सर्व सदस्यांनी एक मुखाने सौ. रोहिणी अहिरराव यांचे नाव जाहीर केल्यामुळे आणि हात वर करून मतदान झाल्यामुळे सगळ्यांनीच या नावाला पाठिंबा दर्शवला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. निवड झाल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री भिमराव नथू अहिरराव यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सौ रोहिणी अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे पती श्री आशिष अंबादास अहिरराव यांच्यासह गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

धाडणे ग्रामपंचायतच्या एकूण 11 सदस्यांपैकी सरपंच सहित एकूण 10 सदस्य हजर होते. यामध्ये नवनिर्वाचित उपसरपंच सौ रोहिणी अहिरराव माजी उपसरपंच श्री. विनायक अहिरराव, माजी उपसरपंच सौ. अनिता अहिरराव, माजी उपसरपंच श्री. यशवंत बोरसे, सदस्य सौ.रंजना लाडे, लिलाबाई गायकवाड, प्रतिभा मोरे, सखाराम सोनवणे, विकास पवार. इत्यादी सदस्य निवडणुकीसाठी हजर होते. या सगळ्यांच्या संमतीने खुल्या पद्धतीने मतदान घेतल्यानंतर सगळ्यांनी याच नावाला पाठिंबा दर्शवल्यामुळे आणि हात वर करून मतदान केल्यामुळे श्री अमरसिंग गावित यांनी सौ रोहिणी अहिरराव यांची उपसरपंच या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि 11.00 वाजता सभेचा समारोप करण्यात आला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें