दुकान लावण्याच्या वादातून चाळीसगाव येथे युवकाची हत्या
चाळीसगाव प्रतिनिधी :-
एकाविरुद्ध गुन्हा दाखल, चाळीसगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील 27 वर्षीय युवकाची दुकान लावण्याच्या जुन्या वादातून विटांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भानुदास पाटील (वय 27, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) असा मृत व्यक्तीचे नाव असून पुढील तपास पोलिस करत आहे.
Author: AVB Majha
Post Views: 813












