कवी मनोहर आंधळें यांच्या कवितेचा राज्याच्या पाठ्यपुस्तकात समावेश

कवी मनोहर आंधळें यांच्या कवितेचा राज्याच्या पाठ्यपुस्तकात समावेश

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- 

येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेचे कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांच्या ‘जिंकू आम्ही लढाई’ या बालकवितेचा राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी हिच कविता कर्नाटक टेक्स्ट बूक सोसायटी, बेंगलोरकडून सातवीच्या वर्गासाठी २०१९ पासून पुढील दहा वर्षांसाठी निवडली गेली होती, २०२३ पासून गुजरात राज्य अभ्यासक्रम मंडळाने आंधळे यांची ‘अवतरले शिवराय’ ही कविता २०२० मध्ये फेब्रुवारीच्या ‘किशोर’ मासिकात प्रसिद्ध झालेली कविता पाचवीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. २०१५ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमातील ‘उपयोजित मराठी’ संदर्भ ग्रंथ पुस्तकात सारांश लेखनासाठी कविता समाविष्ट झाली आहे. सुमारे ३५ वर्षांपासून कविता लिखाण करणाऱ्या कवी मनोहर आंधळे यांच्या आजतागायत २९ कविता बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ‘सौरभ’, ‘लेकी तुझ्यासाठी’ व ‘डोळ्यात कालचे पाणी’ हे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध झाले आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें