इयत्ता दहावी मध्ये धाडणे येथील चि. गुंजन देविदास अहिरराव हा विद्यार्थी 92.80% मिळवून प्रथम.

इयत्ता दहावी मध्ये धाडणे येथील चि. गुंजन देविदास अहिरराव हा विद्यार्थी 92.80% मिळवून प्रथम.

साक्री : – (प्रतिनिधी विलासराव पाटील)

🌹🌹*कर्मवीर शंकरराव चिंधूजी बेडसे विद्यालय, धाडणे यशस्वी निकालाची परंपरा यंदाही कायम🌹🌹*            

साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर शंकरराव चिंधुजी बेडसे विद्यालय, धाडणे या विद्यालयाचा सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता 10 वीचा निकाल 96.29% लागला असून विद्यालयाने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

यामध्ये,चि. गुंजन देविदास अहिरराव 92.80% प्रथम.

चि. भुवनेश महेश घरटे 90.60% द्वितीय.

कु. त्रिवेणी जितेंद्र हिरे 90.20% तृतीय.

या तीन विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत. संस्थेचे विश्वस्त भाऊसाहेब श्री दिपक जयसिंगराव अहिरराव यांनी प्रत्यक्षात सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांची व विद्यार्थ्यांची भेट घेतली . व त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.डी.आखाडे आणि इतर सहशिक्षक आणि इतर कर्मचारीवृंद पण हजर होते.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब पराग बेडसे, सेक्रेटरी भैय्यासाहेब अनिल सोनवणे, विश्वस्त भैय्यासाहेब गजेंद्र भोसले , विश्वस्त भाऊसाहेब दीपक अहिरराव, आबासाहेब संजू पाटील, अण्णासाहेब उत्तमराव बोरसे, व्यवस्थापक मंडळ सदस्य माईसाहेब उज्वला बेडसे, आबासाहेब एल.बी. मोरे, माईसाहेब सुनिता नाईक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माईसाहेब आर .डी. आखाडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें