फलटण पालिकेसाठी ३२ अपक्षांची यशस्वी मनधरणी
२७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात ; नगराध्यपदासाठी दुरंगी लढत
फलटण:
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण पालिकेसाठी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३० अपक्षांची मनधरणी व समजूत काढण्यात सत्ताधारी व विरोधक यशस्वी ठरले नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी १०७ उमेदवारांचे अर्ज मैदानात होते. यापैकी प्रभाग क्रमांक एक व दोन मधील अपक्षांशी भाजप व राष्ट्रवादी ने आघाडी केली आहे याव्यतिरिक्त अनेक अपक्षांचे अर्ज नगरसेवक पदासाठी शिल्लक होते यापैकी बहुतांश अर्ज माघारी घेण्यात भाजपा व राष्ट्रवादी यशस्वी ठरली असून पुढील दुरंगी होणार असून अपक्षांच्या माघारी नंतर ७७ उमेदवार रिंगणात आहेत
बहु प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक अपक्षांच्या उमेदवाराने नेत्यांची डोकेदुखी ठरली होती मात्र गेली तीन दिवस अपक्षांची समजूत काढण्यासाठी नेतृत्व व सुकाणू टीमने पराकाष्ठा केली यामुळे ही लढत आता दुरंगी होणार आहे तरीही ११ ठिकाणी इतर पक्षांनी आपला उमेदवार दिला असून यामध्ये रिपब्लिकन पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , उध्दवसेना यांचे काही मोजके उमेदवार रिंगणात आहेत ११ ठिकाणी अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
नगराध्यपदासाठी पहिल्यांदाच थेट नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकर अशी लढत होत असून दोन्ही गटासाठी ही लढत आता प्रतिष्ठेची झालेली आहे शिंदेंसेनेकडून अनिकेतराजे नाईक निंबाळकर व भाजपा ,राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर समोरा समोर लढत आहेत.













