फलटण शहरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट

फलटण शहर पोलिसांच्या हप्ते खोरीने अवैद्य धंदे फोपवले?
फलटण शहरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट ?
पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विशाल खांबे हप्ते खोरी बंद करून अवैद्य धंद्यावर कठोर कारवाई करणार का?

फलटण शहरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट

फलटण प्रतिनिधी :फलटण शहरात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट सुरु असून, स्थानिक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांचे याकडे दुर्लक्ष केल्याची जनतेकडून तक्रार होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गुटखाबंदीच्या निर्देशांनाही बिनधास्तपणे उलथापालथ करत, फलटण शहरातील अनेक टपऱ्यांवर गुटका विक्री अखंड सुरू आहे. तसेच, अवैद्य मटका, जुगार आणि चक्रीसारखे प्रकार देखील जोरदारपणे फलटणमध्ये चालू आहेत, ज्यामुळे शहरात कायदेशीर अराजकता निर्माण होत आहे.

महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर कडक बंदी घालून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असतानाही, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांनी हे नियम कडक जपलेले नाहीत, त्यामुळे अवैध गुटखा विक्रीचा धंदा आता सार्वजनिकपणे सुरू आहे. शहरातील अनेक टपऱ्यांनी नियमांची पूर्णपणे औंधे मुळी उडवून टाकली असून अन्न-धान्य व सार्वजनिक आरोग्यास बाधा पोहोचत आहे.

याच बरोबर, फलटण शहरात अवैद्य मटका व जुगाराच्या धंद्यांचाही जोम आहे. अशा प्रतिबंधित खेळांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारांमुळे सामाजिक व कायदेशीर दृष्ट्या गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिस उपविभागीय अधिकारी श्री विशाल खांबे यांची भूमिका आणि त्यांच्या कार्यपद्धतीकडे जनतेचे विशेष लक्ष गेले आहे. फलटणकरांना अपेक्षा आहे की, श्री विशाल खांबे यांकडून अवैद्य धंद्यांवर कठोर कारवाई होईल आणि शहरात कायद्याचे शासन स्थापित होईल. त्याच्या कार्यक्षमतेवर फलटणकरांचा देखील विश्वास वाढतोय.

फलटण शहरातील या समस्यांकडे तात्काळ आणि गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सुधारित भूमिका निभवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेने ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें