गणेश उत्सव मंडळांना वर्गणी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धार्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक

सातारा प्रतिनिधी  : सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारीर स्वरुपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास वरील कायाद्याचे कलम 66 व 67 नुसार फौजदारी करवाई करण्याची तरतुद आहे, असे सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी कळविले आहे.

           सन 2025 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. 26 ऑगस्ट 2025 अखेर चालू राहणार आहे. ऑनलाईन गणेशोत्सव परवानगीसाठी अर्ज व अर्ज भरण्याच्या माहिती पुस्तिकेची पीडीएफ ही www.charity.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर Application guidlines/प्रणाली मार्गदर्शन या टॅबखाली उपलब्ध आहे.  

देणगी दारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करून देणगी, वर्गणी बाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळाले बाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असेही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी कळविले आहे.  

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal