कुरंडीमाल येथील आरोग्य पथकात फार्मासिस्ट बनले डॉक्टर ?
👉 चिट्टी लिहिण्या पासुन ते प्रिक्शिप्शन लिहितात हे फार्मासिस्ट??
डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित असतात काय❓
गडचिरोली / प्रतिनिधी दि. 18/6/2025 :-
सरकारी रुग्णालयातील फार्मासिस्टची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये औषधे साठवणे, वितरण करणे, रुग्णांना औषधांबद्दल माहिती देणे आणि आवश्यक सल्ला देणे तसेच औषध व्यवस्थापनात मदत करणे इत्यादींचा समावेश होतो.
डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार (prescription) औषधे योग्य प्रमाणात आणि पद्धतीने रुग्णांना देणे.
औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही हे तपासणे, त्यांची गुणवत्ता आणि वैधता (validity) सुनिश्चित करणे.
रुग्णांना त्यांच्या औषधांबद्दल, त्यांच्या वापराच्या पद्धती, दुष्परिणाम (side effects) आणि इतर आवश्यक माहिती देणे.
औषध व्यवस्थापनात मदत करणे , डॉक्टर्स , नर्सेस आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून रुग्णांना चांगली आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मदत करणे. फार्मसी विभागातील आवश्यक नोंदी ठेवणे, आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि फार्मसी विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे.
नवीन औषधोपचारांच्या माहितीवर अपडेट राहणे,
फार्मसी क्षेत्रातील नवीन घडामोडी, नवीन औषधे आणि उपचारांच्या पद्धतींवर सतत अपडेट राहणे.
रुग्णांच्या औषधोपचारांशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे आणि त्यांना आवश्यक मदत करणे.
औषधांची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे, तसेच फार्मसी विभागातील कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे. हे
सरकारी दवाखान्यातील फार्मासिस्टची भूमिका रुग्णांसाठी आवश्यक आणि महत्वाची आहे. मात्र आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी प्राथमीक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथक येथील फार्मासिस्ट पंकज होकम यांनी एका रुग्णाची चिट्टी स्वतः लिहिली आणि त्या चिट्टीवर आपल्या हस्ताक्षरात औषधही लिहिली आणि औषध दिले. या प्रकारामुळे भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनाच्या कार्यकुशलतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पथकमध्ये कार्यरत मानसेवी डॉ. खूशी मेश्राम या मुख्यालयी न राहता ब्रम्हपुरी येथुन येतात. या पथकामध्ये रुग्ण सेवा देण्यासाठी केवळ ११ वाजेपर्यंत ओपीडी सुरू ठेवली जाते. मात्र दुपारच्या नंतर ओपीडी सुरू केली जात नाही. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरुंडी अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या मिळणाऱ्या शासकीय मोबदल्यातुनही पैसे वसुली करण्यात येत असल्याची चर्चा भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात ऐकावयास मिळत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू करून आशा स्वयंसेविकांना योग्य न्याय द्यावा. आणि संबंधित
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी.अशी मागणी जोर धरत आहे










