शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी आवाहन

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी आवाहन

सातारा, : सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्ह्यातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये सन २०२५-२६ मध्ये आठवी ते बारावी तसेच बीए, बीकॉम, बीएस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागेवरती गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश देण्यात येतील. सदर वसतिगृहामध्ये इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी, इयत्ता ११ वी, १२ वी व १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी/ पदवीका विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पोर्टलद्वारे (https://hmas.mahait.org) या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरण्यास दिनांक सुरुवात होत आहे. वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोई-सुविधा अंतर्गत – निवास, व भोजन मोफत पुरविणेत येते. तसेच शाळा, महाविद्यालयांने ठरवून दिलेले गणवेश, स्टेशनरी व क्रमिक पुस्तके व इतर साहीत्यासाठी नियमानुसार देय असलेली रककम प्रवेशित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करणेत येते. वसतीगृहातील प्रवेशित मुलांना खर्चासाठी रू. ५००/- व मुलींना रूपये ६००/- विशेष भत्तासह दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. सातारा जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल सादर केल्यास वसतीगृह प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील. तरी गरजू विद्यार्थी व पालकांनी वसतीगृह प्रवेश अर्ज भरणेबाबत, श्री सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा. हे आवाहन करीत आहेत. संपर्कासाठी पत्ता :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा ४१५००३, संपर्क दूरध्वनी क्र. (०२१६२) २९८१०६

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें