चाळीसगावच्या कथित शांताबाई विरोधात अखेर खंडणीचा गुन्हा दाखल

चाळीसगावच्या कथित शांताबाई विरोधात अखेर खंडणीचा गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासून शांताबाई या फेसबुक अकाउंटवर समाजातील प्रतिष्ठित लोकांची बदनामी व त्यांच्यावर चिखलफेक केली जात होती. याच अनुषंगाने हिंगोणे येथील माध्यमिक शिक्षक अजित शेख खाटीक यांच्या बाबतीतही शांताबाई या अकाउंटवर बदनामीकारक पोस्ट केली होती. आमच्याकडे तुमचे अजून व्हिडिओ असून आम्ही ते अपलोड करु अशी धमकी देऊन वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती.

त्या अनुषंगाने शांताबाईने मध्यस्थी मुराद पटेल यांच्यामार्फत फिर्यादीकडून रुपये २० हजार रोकड व १० हजार फोनपेने घेतले व बदनामी केली म्हणून शांताबाई हे अकाऊंट धारक रणजित कुमार सुदेश दरोडे (३२) नेताजी चौक चाळीसगाव, मुराद पटेल चाळीसगाव व इम्रान शेख मेहुणबारे यांच्या व इतर साथीदारांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये खंडणी मागितली व शिक्षकाची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप घुले व सहकारी करित आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें