चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर, ११० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते ३० साठीचे आरक्षण घोषित

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर, ११० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते ३० साठीचे आरक्षण घोषित

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत दि.२१ रोजी दुपारी प्रशासकीय इमारतीत काढण्यात आली. या सोडत मध्ये ११० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे सन २०२५ ते ३० साठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ११० ग्रामपंचायतच्या सन २०२५ ते ३० या कालावधी साठीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार प्रशांत पाटील, निवासी तहसीलदार प्रथमेश मोहोळ, निवडणूक अधिकारी संदेश निकुंभ यांच्या उपस्थितीत साडेतीन वर्षीय आरव अहिरे यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. या सोडतीत अनुजाती प्रवर्ग सरपंच पदासाठी १२, अनु जमाती, प्रवर्ग सरपंच पदसाठी १७ व ना.मा.प्र. सरपंच पदासाठी २६ तसेच सर्वसाधारण सरपंच पदासाठी ५० या प्रमाणे जागा जाहीर झाल्या असून ५५ महिलांना ५० टक्के आरक्षण नुसार सरपंच पदासाठी संधी मिळाली आहे.

*अनु जाती प्रवर्ग सरपंचपद*

यात लोंजे (महिला), शिंदी (महिला व पुरुष), दरेगाव (महिला), माळशवगे (महिला), वलठाण (महिला व पुरुष), अंधारी (महिला व पुरुष), बाणगाव (महिला व पुरुष), गणेशपूर (महिला), बोरखेडे खु. (महिला व पुरुष), टाकळी प्र.चा. (महिला व पुरुष), जुनोने (महिला), वडाळा वडाळी (महिला)

*अनु जमाती प्रवर्ग सरपंचपद*

खेरडे (महिला), आडगाव (महिला व पुरुष), रोकडे (महिला व पुरुष), डोणदिगर (महिला), पोहरे (महिला व पुरुष), खेडी खू. (महिला), टाकळी प्र.दे. (महिला व पुरुष), वाघळी (महिला व पुरुष), तळोदे प्र.चा. (महिला), सांगवी (महिला व पुरुष), पातोंडा (महिला), वाघले (महिला), पिंप्रि खु. (महिला), भोरस बु. (महिला व पुरुष), रांजणगाव (महिला), बोरखेडे बु. (महिला व पुरुष), तांबोळे (महिला).

*ना.मा.प्र. सरपंचपद*

दस्केबर्डी (महिला), तळेगाव (महिला व पुरुष), खडकी बु (महिला), ओझर (महिला), पिलखोड (महिला), देवळी (महिला), खेडगाव (महिला व पुरुष), कोदगाव (महिला व पुरुष), बेलदारवाडी (महिला व पुरुष), पाटणा (महिला व पुरुष), कृष्णनगर (महिला व पुरुष), जामदा (महिला व पुरुष), नांद्रे (महिला व पुरुष), न्हावे (महिला), जामडी प्र.ब. (महिला व पुरुष), लोंढे (महिला), बिलाखेड (महिला), सायगाव (महिला व पुरुष), पिंप्री बु.प्र.चा. (महिला), बोढरे (महिला व पुरुष), चिंचगव्हाण (महिला), टेकवाडे खु. (महिला व पुरुष), गोरखपुर (महिला), सुंदरनगर (महिला व पुरुष), मुंदखेडे खु. (महिला), पिंपरखेड (महिला),

पिंपळवाड निकुंभ (महिला व पुरुष), हातले (महिला व पुरुष), शिरसगाव (महिला), शिदवाडी (महिला), दहिवद (महिला व पुरुष), चितेगाव (महिला व पुरुष), दसेगाव बु. (महिला व पुरुष), कुंझर (महिला), चांभार्डी खु. (महिला), तरवाडे बु (महिला), पिंप्री बु.प्र.दे (महिला), अलवाडी (महिला), पिंपळवाड म्हाळसा (महिला व पुरुष), करजगाव (महिला), खडकीसीम (महिला व पुरुष), मेहुणबारे (महिला), बहाळ (महिला), उंबरखेड (महिला व पुरुष), हिंगोणेसीम (महिला व पुरुष), हिरापुर (महिला), खरजई (महिला), उपखेड (महिला व पुरुष), रहिपुरी (महिला), भामरे बु. (महिला व पुरुष), रोहिणी (महिला), ब्राम्हणशेवगे (महिला व पुरुष), हातगाव (महिला व पुरुष), वाकडी (महिला), देशमुखवाडी (महिला व पुरुष), पळासरे (महिला व पुरुष), रामनगर (महिला), तमगव्हाण (महिला व पुरुष), मांदुर्णे (महिला व पुरुष), वाघडु (महिला), डामरुण (महिला व पुरुष), विसापुर (महिला व पुरुष), तामसवाडी (महिला), धामणगाव (महिला), भवाळी (महिला व पुरुष), मुंदखेडे बु. (महिला व पुरुष), सेवानगर (महिला), चांभार्डी चांभार्डी बु. (महिला), कळमडु (महिला व पुरुष), भऊर (महिला व पुरुष), राजदेहरे (महिला व पुरुष), चिंचखेडे (महिला), वडगाव लांबे (महिला व पुरुष), ओढरे (महिला व पुरुष), तळोदे प्र.दे. (महिला), पिंपळगाव (महिला), हिंगोणे खु. (महिला), तिरपोळे (महिला), वरखेडे बु. (महिला व पुरुष), घोडेगाव (महिला), आंबेहोळ (महिला). असे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें