अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीना केले जेरबंद*
अग्नीशस्त्र व मोटारसायकल असा एकुण १,२५,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
सातारा प्रतिनिधी:)
दि.१३/०४/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे सांना त्यांचे खास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोटारसायकल वरुन दोन इसम मोळाचा ओढा सातारा ते करंजे नाका सातारा जाणारे रोडने जाणार असुन त्यांचे जवळ पिस्टल सारखे अग्नीशस्त्र असुन त्यांना ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने मिळाले गोपनिय बातमीच्या अनुषंगाने मोळाचा ओढा सातारा ते करंजे नाका सातारा जाणारे रोडवर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मिळाले बातमीच्या वर्णनातील दोन इसम मोटारसायकल वरुन येत असल्याचे पाहुन आम्ही पोलीस स्टाफने त्यांना थांबविले असता ते पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले त्यावेळी आम्ही त्यांना पकडून ताब्यात घेवुन त्यांना पळुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नाहीत. म्हणुन सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल मिळुन आले. त्यावेळी दोघांना त्यांचे जवळ मिळुन आलेल्या पिस्टल बाबत त्यांचेकडे पिस्टल जवळ बाळगणेचा परवाना आहे काय? याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांचे जवळ कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने नमुद गुन्ह्यातील आरोपीस गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेवुन आरोपीची नामे
१) रवि रविंद्र जाधव वय २३ वर्षे रा. बेघर वस्ती भुईंज ता. वाई जि. सातारा २) रेवणसिद्ध भिमाअण्णा पुजारी वय.२७ वर्षे रा. सोसायटी जवळ भुईंज ता. वाई जि.सातारा त्यांना अटक करुन त्यांचेकडुन ७५,०००/- रु. किंमतीचे अग्नीशस्त्र व ५०,०००/- रु. किंमतीची मोटारसायकल असा एकुण १,२५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी केली आहे.













