सोनगाव बंगला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायतीकडून आवश्यक साहित्याची भेट – आदर्श सरपंच सौ. राणिताई गोरवे यांचा पुढाकार
सोनगाव बंगला (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मागील वर्षी गावातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका’ स्थापन करण्यात आली. ही अभ्यासिका गावातील सर्व तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे.
या उपक्रमात आणखी भर टाकत, सोनगावच्या नवनिर्वाचित आदर्श सरपंच सौ. राणिताई संतोष गोरवे यांनी अभ्यासिकेसाठी आवश्यक वस्तू ग्रामपंचायतीच्या इतर खर्च निधीतून उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये खुर्च्या, प्रशस्त टेबल, पाणी कुलर आदी साहित्याचा समावेश होता. या सहकार्यामुळे अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून त्यांचे अभ्यास अधिक परिणामकारक होईल.
या सहकार्याबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका’च्या वतीने सरपंच सौ. राणिताई गोरवे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी या उपक्रमात यापूर्वी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. अभ्यासिकेच्या साहित्य मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य श्री. पोपटराव बुरुंगले यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळेस श्री प्रथमेश नामदास यांनी अभ्यासिकेला पोलिस भरती साठी आवश्यक असलेले पुस्तक भेट दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्रा राजेश निकाळजे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्री. संतोष गोरवे, कांतीलाल चव्हाण, सुधीर ओव्हाळ, धर्मराज लांडगे, संदीप पिंगळे, दत्तात्रय ननावरे, दीपक लोंढे (पोलीस पाटील), भगवान जगदाळे, रामहरी पिंगळे, सुनील यादव, अनिल यादव, राहुल यादव, योगेश यादव, संतोष आडके, डॉ विजय पिंगळे, लक्ष्मण गायकवाड, हनुमंत गायकवाड, गणेश कांबळे, अतुल लोंढे, रमेश मदने, सुरेश पवार, गणेश नामदास, मनोज लोंढे, गणेश खरात, संदीप ओव्हाळ, आदित्य गोरवे, बाळकृष्ण रिटे, हरिश्चंद्र लोंढे, तुषार लोंढे, सूरज गोरवे,हृतिक नामदास, यांचा सहभाग होता.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













