मा. अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश, वाई यांनी पिडीतेवर लैगिंक अत्याचार करणा-या आरोपीस सुनावली सात वर्ष कैदेची शिक्षा.
सदर दिनांक १९/०३/२०१३ रोजी सायंकाळी १७.४५ वाजता. मौजे कवठे ता. वाई गावचे हद्दित आरोपी अमोल अशोक खरात याने पिडीतेस उचलून घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणून वगैरे मजकुरचे खबरीवरुन भुईज पोलीस ठाणे गु.र.नं ४७/२०१३ पोस्को कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल केला आहे. गुन्हयाचे तपासा दरम्याण आरोपी अमोल अशोक खरात वय २७ वर्ष रा. कवठे ता. वाई जि. सातारा याचे विरुध्द तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि श्री. एन. व्ही. पवार भुईज पोलीस ठाणे यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. –
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. आर. एन. मेहेरे, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश, वाई यांचे न्यायालयात पुर्ण होवून सरकारतर्फे अतिरीक्त, सरकारी अभियोक्ता श्री. डी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले आहे. सदर केस मध्ये एकूण ०७ साक्षीदार तपासले, परिस्थीतीजन्य पुरावा व साक्षीदार यांचे साक्षीवरुन मा. श्री आरएन मेहेरे, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश, वाई यांनी आरोपी अमोल अशोक खरात वय – २७ वर्ष रा. कवठे ता. वाई जि. सातारा यास दोषी ठरवून त्यास सदर गुन्हयात ७ वर्ष शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरलेस १५ दिवस साधी कैद हि शिक्षा सुनावली आहे.
सदर केस कामी मा. श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, तत्कालीन तपासी अंमलदार स.पो.नि.श्री.एन.व्ही. पवार, पैरवी अंमलदार म.पो.कॉ. घोरपडे, पो. कॉ. आगम यांनी योग्य ती मदत केली आहे. तपासी अंमलदार तसेच प्रोसीक्युशन स्कॉडचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.













