दिव्यांग मुलांसाठी 7 मार्च रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
सातारा दि. : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयांतर्गत सातारा जिल्हयामध्ये अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा,कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृह कार्यरत आहेत. या शाळांमधील मुलांच्या सन २०२४-२५ साठीच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 7 मार्च रोजी पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजित केली आहे.
स्पर्धेमध्ये एकूण ३०० मुलांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मुलांची नावे नागपूर येथे होणाऱ्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेणेसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावर यांनी दिली आहे.
Author: AVB Majha
Post Views: 179













