दिपाली निंबाळकर राजे गटातच
फलटण प्रतिनिधी : मागील आठवड्यात राहुल निंबाळकर यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.त्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राहुल निंबाळकर यांच्या वहिनी व माजी नगरसेविका दिपाली निंबाळकर यांनी बैठकीला उपस्थित राहत आपण राजे गटातच असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील असंख्य राजे गटाचे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: AVB Majha
Post Views: 707













