एनएसएस म्हणजे सृजनशील नागरिक बनवणारे विद्यापीठ आहे- प्राचार्य डॉ. मकरंद वझल यांचे प्रतिपादन

एनएसएस म्हणजे सृजनशील नागरिक बनवणारे विद्यापीठ आहे- प्राचार्य डॉ. मकरंद वझल यांचे प्रतिपादन

कोंढवा: सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच्या वतीने हिवरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी युथ फॉर डिजिटल लिटरसी व युथ फॉर माय भारत ही थीम घेऊन सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉक्टर मकरंद वझल अध्यक्ष म्हणून बोलत होते, यावेळी त्यांनी एनएसएस म्हणजे सृजनशील नागरिक बनवणारे विद्यापीठ आहे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना पुढे ते असे म्हणाले की, सिंहगडचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा सदैव कार्यतत्पर असतो. त्याला सामाजिक समस्या, संस्कार व संस्कृती याचे सदैव भान असते. सामाजिक कार्यात युवक नेहमीच अग्रेसर आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदर खरेदी विक्री संघाचे सदस्य एम. के. गायकवाड नाना, हिवरे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ भारतीताई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर कुदळे, उपसरपंच श्री रामदास कुदळे हिवरे गावचे पोलीस पाटील पुरुषोत्तम तिवटे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव गायकवाड, शब्बीर भाई शेख, माजी पोलीस पाटील शंकर कुदळे, हिवरे गावचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश शेठ कुदळे, ग्राम पंचायत सदस्य सागर कुदळे, गुरुवर्य नारायण महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता रायडू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेच्या मुख्याध्यापिका सौ नालिता नेवसे हे उपस्थित होते

याप्रसंगी एम के गायकवाड यांनी युवकांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. दिनांक 03 फेब्रुवारी रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन हिवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच रमेश शेठ कुदळे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद वझल व शंकर कुदळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये डॉ. मकरंद वझल यांचे एनएसएस व सामाजिक उपक्रम, प्रा. मलसिद्ध कुमठाले यांचे स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी व नियोजन, शिवव्याख्याते प्रा. शाम लडकत यांचे शिवाजीमहाराज दी मॅनेजमेंट गुरू, प्रा. मंगेश महाजन यांचे अंधश्रद्धा निर्मूलन, प्रा अविनाश पाटील यांचे मेडीटेशन व योगा, ब्रह्मकुमार जीवराज यांचे डिजिटल वेलनेस , या विषयांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेसाठी शोषखड्डा व कचराकुंडी तयार केली, तसेच ग्रामस्वच्छता , प्रभातफेरी, पथनाट्य, ग्राम सर्वेक्षण, मतदान नोंदणी व जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, वृक्षारोपण व संवर्धन. तसेच महसूल विभाग अंतर्गत पीक पाहणी नोंद गावचे पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली. असे विविध सामाजिक उपक्रम राबविले .तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अंतर्गत वक्तृत्व व संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास या विषयी मार्गदर्शन केले.हिवरे ग्रामस्थांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. एम. के. गायकवाड नाना यांनी आपले मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा घेतला व प्लास्टिक ब्रिक्स या संकल्पनेला विशेष कार्य केले असे नमूद केले.

गावचे पोलीस पाटील पुरुषोत्तम तीवटे यांनी मुलांनी पीक नोंदणी मध्ये सहभाग घेतल्याबद्दल महाविद्यालयाचे व सर्व शिबिरार्थिंचे विशेष कौतुक केले

रमेश कुदळे यांनी सिंहगडचा विद्यार्थी हा सामाजिक कर्तव्याबद्दल सजग व जागृत आहे असे मत व्यक्त केले.

ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामपंचायती तर्फे सर्व विद्यार्थ्याचे केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. समारोप प्रसंगी हिवरे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,ग्रामस्थ, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पुणे जिल्हा विभाग समन्वयक व महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश पाटील यांनी प्रास्तविक केले तर डॉ.अर्चना भिसे यांनी आभार मानले. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एम.एन.नवले , संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले, उपाध्यक्ष (एच.आर.) डॉ.रोहित नवले, उपाध्यक्षा (एडमिन) रचना नवले – अष्टेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद वझल, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश पाटील, डॉ.अर्चना भिसे, प्रा सपना मालपाणी, डॉ. रेखा केंद्रे, प्रा दिपाली गायकवाड , श्री अजित कामठे यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर