उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथील मुक्त कृषी शिक्षण केंद्रात स्व. यशवंतराव चव्हाण जयंती साजरी
फलटण प्रतिनिधी: मंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील मुक्त कृषी शिक्षण केंद्राच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी मान्यवर म्हणून महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष श्री. शरदराव रणवरे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. शिरीष भोसले, जिल्हा परिषद सातारा चे माजी अभियंता श्री. संजय भोसले, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. काळे सर, गुरुद्रोन अकॅडमीचे श्री. अविनाश नरुटे, श्री. कोकरे सर तसेच संशोधन सहयोगी डॉ. योगेश खाटके उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. ए. डी. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजहिताचे कार्य करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












