ग्रामीण रुग्णालय साक्री येथील वैद्यकीय अधीक्षकच गैरहजर असल्यामुळे रुग्णांचे हाल
साक्री प्रतिनिधी : _ (विलासराव पाटील) वर्धाने तालुका साक्री येथील भारती चित्ते नावाच्या एक महिला रुग्ण पडून गेल्यामुळे ग्रामीण रुग्णालय साक्री येथे आलेल्या होत्या. त्यांच्या पायाला दुखापत झालेली होती परंतु प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्लास्टर देण्याची गरज तेथील डॉक्टरांना वाटली. म्हणून त्यांना धुळे येथे रेफर करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु शिफारस पत्रावर वैद्यकीय अधीक्षक यांची सही असल्याशिवाय त्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. सकाळी नऊ वाजेपासून आलेल्या पेशंट साडेअकरा पर्यंत दवाखान्यात थांबलेल्या होत्या. तोपर्यंत वैद्यकीय अधीक्षक आलेल्या नव्हत्या. मी आता इथून एवढ्या उशिरा धुळ्याला सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आणि तिथून परत साक्रीला येऊन माझ्या गावाला जायचं.माझं गाव रस्त्याला नसल्यामुळे मला वाहनांचीपण भरपूर अडचण असते अशी खंत त्या बाईंनी व्यक्त केली.वैद्यकीय अधीक्षकांचं हे सतत उशिरा वगैरे येणं आणि मनमानी पद्धतीने ड्युटी करणं, त्यामुळे तिथल्या प्रशासनावर पकड दिसत नाही. धुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा तालुका असे म्हणण्यापेक्षा किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तालुका असा या तालुक्याचा नावलौकिक आहे आणि एवढ्या मोठ्या तालुक्याच्या लोकसंख्येला ग्रामीण रुग्णालय येथे हाडांचे डॉक्टर उपलब्ध नसणे ही सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. किरकोळ प्लास्टर देण्यासाठी सुद्धा इथल्या पेशंटला जर धुळे जावे लागत असेल तर या गोष्टीचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करावा अशी तेथील रुग्णांमध्ये चर्चा होती. वरिष्ठांनी जर ठरवले तर तालुक्यामध्ये अनेक एम एस ऑर्थो डॉक्टर असून ते त्यांना तात्पुरती सेवा देण्यासाठी पण बोलावू शकतात.












