अवैध वाहतूक करणारे ट्रक वनविभागाकडून जप्त

अवैध वाहतूक करणारे ट्रक वनविभागाकडून जप्त

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)

वनपरीक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल 10 रोजी रात्री शहरतील मालेगाव रस्त्यावर अवैध निंब, लोखंडी, भोकर जळाऊ लाकूड वाहतूक करत असणारे MH19 G 0100 व MH20 DE 9252 हे दोन ट्रक जप्त करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. 10 रोजी चाळीसगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांना गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक मालेगावकडे जाणार आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ एक पथक नेमून सदर ट्रक जप्त करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार या पथकाने सापळा रचून रात्री 1:30 वाजेच्या सुमारास निम,भोकर, लोखंडी प्रजातीचे जळाऊ लाकूड भरलेला मिळून आला. ट्रक चालकास वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता तो मिळून आला नसल्याने सदर ट्रक हे वनपरीक्षेत्र कार्यालय चाळीसगाव (प्रा) येथे आणून लावण्यात आला तर दुसरी ट्रक सकाळी 4:30 वाजेच्या सुमारास मिळून आला. या दोन्ही अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक वर भारतीय वन अधिनियम 1927अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही ही उपवनसंरक्षक जळगाव राम धोत्रे, वनसंरक्षक अमोल पंडित, चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात वनपाल सी.व्ही.पाटील, वनपाल सागर पाटील, वनरक्षक ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, उमेश सोनवणे, रखवालदार संजय गायकवाड, भटू अहिरे, राहुल मांडोळे यांचा समावेश होता. पुढील तपास वनपाल घोडेगाव सागर पाटील हे करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें