कर्तबगार महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न, सुजन फाउंडेशनचा समाजऋण जागृत करणारा उपक्रम

कर्तबगार महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न, सुजन फाउंडेशनचा समाजऋण जागृत करणारा उपक्रम

 

खंडाळा प्रतिनिधी

गणेश गुरव

        जागतिक महिला दिन याचे औचित्य साधून सुजन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कर्तबगार महिला सन्मान सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले यांच्या पनतूसून श्रीमती नीताताई होले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयश्री यादव, डॉ. दिपाली क्षीरसागर, खंडाळा पंचायत समिती सदस्या सौ. छायाताई जाधव, सौ. शलाका कणसे-ननावरे (संचालक, आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था सातारा) तसेच लोणंद पोलीस स्टेशनच्या महिला प्रतिनिधी संतोषी होळकर व अमृता चौधरी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष सौ. शितल शेळके-पाटील (संस्थापक अध्यक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरितक्रांती सहकारी महिला पतसंस्था लोणंद) यांनी उपस्थित मान्यवर व महिला भगिनींचे स्वागत केले.

       समाजातील विविध क्षेत्रांत कुटुंब सांभाळत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्राचार्य शर्मिला नेवसे, सौ. विद्या सुनील शिंदे (योग शिक्षिका, फलटण), श्रीमती लीला वाघमारे (सुखेड), सौ. अरुणा कुरपड (विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग कोरेगाव), सौ. स्नेहल काळे, श्रीमती नजमा पठाण, सौ. संगीता गोरड (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका), श्रीमती रजनी शिंदे (वनस्थळी व्यवस्थापिका, लोणंद) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांचा कर्तबगार महिला सन्मान देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सौ. आसावरी नेवसे (उद्योजिका), सौ. इंदुमती धायगुडे (ग्रामसेविका), माधुरी भोसले (पत्रकार), समीना शेख (कार्यकर्त्या), सुनिता जाधव (LIC प्रतिनिधी), अनुराधा गारळे (फोटोग्राफर), सुनिता घनवट, सौ राजश्री रासकर, सौ रेखा जगताप, , सौ अर्चना हिंग्लजकर, सुप्रिया पवार, रूपाली गोरे (सचिव, मयुरेश्वर पतसंस्था), सौ. भोसले मॅडम (सचिव मराठा पतसंस्था), स्मिता क्षीरसागर (फार्मासिस्ट), सौ. नीता खोमणे (असेन्ट इंग्लिश मीडियम स्कूल) , सौ दिपाली जाधव ( मुख्याध्यापिका जि प शाळा मोर्वे), सौ रोहिणी जाधव(कृषी) आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कुमारी स्वरा जाधव हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून दिला. कवयित्री अलका बनकर जेजुरी, कवियत्री उज्वला कुंभार सुखेड व कवियत्री अर्चना हिंग्लजकर यांनी महिला दिनी आपल्या स्वरचित कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.सौ. विद्या शिंदे (योग प्रशिक्षक) यांनी महिलांना योग व आहाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री यादव यांनी आरोग्य विषयक माहिती दिली, तर लोणंद पोलीस स्टेशनच्या महिला प्रतिनिधींनी अमृता चौधरी यांनी महिला व मुलींचे कायदेशीर हक्क व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात नीताताई होले यांनी फुले दांपत्यांनी स्त्री शिक्षण, समानता व बंधुता यासाठी केलेले कार्य आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे सांगितले.

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम संयोजक सौ स्मिता क्षीरसागर, सौ. गीतांजली शिंदे, सौ. अर्चना शिंदे, सौ. अश्विनी जाधव, शुभदा झणझणे,श्री. प्रशांत शिंदे, श्री. सुनील रासकर, श्री. बबलू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शुभम नेवसे, वैभव क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, निखिल राऊत, महादेव क्षीरसागर (अध्यक्ष, संत सावता महाराज सेवाभावी संस्था लोणंद), संजय जाधव (अध्यक्ष, राष्ट्रीय परिवर्तन संघ), अमृता मंगल कार्यालय व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते राजेश भाटिया, किरण जाधव (अध्यक्ष, साथी फाउंडेशन) , श्री संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.

       या कर्तबगार महिला सन्मान समारंभासाठी लोणंद व परिसरातून बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अजित जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. रघुनाथ शेळके सर यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें