8 मार्च 2026 महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्या सदस्या सौ अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा सत्कार….!
फलटण रनर्स फाऊंडेशन महिला सदस्या सौ. अनुजा आदित्य त्रिपुटे यांनी 8 मार्च 2023 रोजी महिला दिना निमित्त नीरा येथील मॅरेथॉनमध्ये प्रथम सहभाग नोंदवून आपल्या रनिंग प्रवासाची सुरुवात केली आणि 5 किमी धाव पूर्ण केली.
यानंतर सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा (डोंगर रांगामधील)मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून अवघड अशी 50 किमी धाव यशस्वीरीत्या पूर्ण केली व फलटण तालुक्या मधील पहिली अल्ट्रा मॅरेथॉन महिला रनर म्हणून मान मिळवला
त्यांच्या मॅरेथॉन प्रवासाचा आढावा –
• 2023 मध्ये 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी अशा एकूण 7 मॅरेथॉन पूर्ण.
• 2024 मध्ये 21 किमीच्या 5 मॅरेथॉन पूर्ण.
• 2025 मध्ये 21 किमीच्या 2 आणि 42 किमीच्या 2 मॅरेथॉन पूर्ण केल्या. यामध्ये टाटा मुंबईसारखी नामांकित मॅरेथॉन देखील यशस्वीरीत्या पूर्ण केली.
• 2026 मध्ये लोणावळा येथे झालेल्या टाटा मुंबई अल्ट्रा (डोंगराळ भागातील)मॅरेथॉनमध्ये 50 किमी धाव पूर्ण केली.
अशा ध्येयवादी व प्रेरणादायी महिला सदस्या सौ. अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्यावतीने सत्कार करण्यात आला आणि इतर सर्व महिलांना या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी फलटण रनर्स फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ रवींद्र शिंदे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते.












